रविकांत तुपकर राष्ट्रवादीकडून निवडणूक  लढणार ?

 महाआघाडीत जागा वाटपाचा तिढा अजुनही कायम आहे . जागा वाटपांचा हाच तिढा सोडण्यासाठी राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे शर्थीचे प्रयत्न करतायेत . एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस , भारिप-एमआयएम आणि  मनसे या सगळ्या पक्षांना पवारांना सोबत घ्यायचे आहे त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही महाआघाडीत सामवून घ्यायचं आहे . यात जागांचा तिढा मात्र कायम आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना तीन जागांची प्रामुख्याने मागणी  करते आहे यात हातकणंगले ,वर्धा आणि बुलढाणा या तीन जागांचा समावेश आहे. यामधील बुलढाण्याची जागा ही स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना लढवायची आहे .सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा तिढा सोडवण्यासाठी शरद पवारांनी बुलढाण्याची  जागा रविकांत तुपकर यांना राष्ट्रवादी च्या चिन्हावर लढविण्याचा सल्ला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर तशी हालचाल हि राष्ट्रवादीत चालू आहे आताच मागच्या आठवड्यात शरद पवारांचे नातू रोहित पवार हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना अचानक रविकांत तुपकरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली त्यामळे हि सदिच्छा  भेट होती कि राजकीय भेट होती ?हि चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे .....