बुलढाणा जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान !!!

सतराव्या लोकसभा  निवडणुकीचा बिगुल १० मार्च रोजी झालेल्या इलेक्शन कमीशन च्या पत्रकार परिषदेत वाजला. पत्रकार परिषद चालू झाल्यावर त्याक्षणी संपूर्ण भारतात आचार संहिता लागू करण्यात आली. त्यामध्ये घोषणा  करताना महाराष्ट्रातील मतदान हे एकूण चार टप्यात होणार आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील  मतदान हे १८ एप्रिल म्हणजेच दुसऱ्या टप्यात होणार आहे आणि  याचा निकाल अर्थातच २३ मे रोजी लागणार आहे . २०१४ साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेत बुलढाणाकरांनी शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना कौल दिला होता . प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला होता . त्यावेळी नासा वरून आलेल्या बाळासाहेब दराडे यांनी सुद्धा अपक्ष लढून २९,७८९ एवढी मते घेतली होती . यावेळी प्रतापराव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे डॉ .राजेंद्र शिंगणे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे कळते आणि तसेच यावर्षी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे सुद्धा खासदारकी साठी इच्छुक आहेत त्यामुळे या वेळेस जिल्ह्यात दुहेरी कि तिहेरी लढत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . या वेळेस जिल्ह्यात युवा मतदार सुद्धा २०१४ च्या तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढले आहे यासोबतच मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे वेळ कमी राहिला असल्याने राजकारण्यांची आहे कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होणार आहे एवढ मात्र निश्चित आहे .