चिखली : गेल्या २५ वर्षांपासून संभाजी ब्रिगेड सार्वजनिक जीवनात , समाजकारणात कार्यरत असून तीन वर्षपासून राजकारणात पदार्पण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर आता जिंकण्याचे ध्येय समोर ठेवून संभाजी ब्रिगेड आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड चे राज्य प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी चिखली इथे दिली. त्यांनी ५ जुने रोजी चिखली इथे संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीपूर्व शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत तात्काळ सरकारने खात्यात जमा कारावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड ची आहे, असे त्यांनी या वेळी नमूद केले. व्यवस्था परिवर्तन  समोर ठेवून छत्रपती शिवारायांचे स्वराज्य साकारण्यासाठी संभाजी ब्रिगेड ने विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले असून दारूमुक्त गाव शेतीमालाला हमीभाव हे ब्रीद वाक्य व विकासाचे अनेक मुद्दे घेऊन आगामी निवडणूक लाडवणार असल्याचा पुनरुच्चार भानुसे यांनी केला. आगामी काळात मात्र संभाजी ब्रिगेड ला महाराष्ट्रात किती जागा जिंकणार हे पाहन मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे.