वंचित बहुजन आघाडी मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात उधाण .... 

खामगाव : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ची जादू मोठ्या प्रमाणात चालली . औरंगाबाद सारख्या मोठ्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी चा एक उमेदवार निवडून आल्याने वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात खाते उघडले आहे . आता वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे . यातच काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचं  सूतोवाच बाळासाहेबांनी केल होत. यातच माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची त्यांच्या अकोल्यातील यशवंत भवन इथे भेट घेतली. या भेटीमुळे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय चर्चांना समाजमाध्यमांवर उधाण आले होते . विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी जिल्ह्यात घडतायेत. मागच्या आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सानंदा यांची खामगाव मध्ये भेट घेतली होती तेव्हा सानंदा भाजप मध्ये पक्षप्रवेश करणार की काय अशी चर्चा रंगली होती त्यातच जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे आमदार राहुल बोन्द्रे हेदेखील भाजप मध्ये पक्षप्रवेश करणार की काय अशी चर्चा रंगली होती पण आ. राहुल बोन्द्रे यांनी पक्षप्रवेशाला साफ इंकार केला आहे . माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे सन  १९९९ पासून २०१४ पर्यंत खामगाव मतदारसंघातून सलग आमदार होते मात्र २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. १९९९ साली जेव्हा सानंदा पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा भारिप आहे काँग्रेस यांची युती होती. त्यामुळे दिलीपकुमार सानंदा हे वंचित बहुजन आघाडी मध्ये जाणार या चर्च्यांना बुलढाणा जिल्ह्यात उधाण आलय . पण दिलीपकुमार सानंदा यांनी बाळासाहेबांशी झालेली भेट हि पारिवारिक असून यामध्ये कुठंही राजकीय चर्चा झाली नाही असे नमूद केले. राजकारणात कोणी कुठेही जाओ आणि कुठेही येओ पण जिल्ह्या सध्या दुष्काळाने होरपळतोय या कडे सध्या जिह्यातील सगळ्या राजकारण्यांनी लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा सध्या जिल्ह्यातील जनता करतीये .....
 "ये जनता है साहब , ये सब जानती है " असा कधी कधी म्हणावं लागत .