देऊळगाव मही येथील पूल पाण्याखाली
दे.मही :-खडकपूर्णा प्रकल्पातून सद्यस्थितीत विसर्ग वाढविण्यात येत आहे. चिखली- जालना महामार्गावरील देऊळगाव मही येथील पूल पाण्याखाली गेला असून पुलावरील वाहतूक बंद झाली आहे.जिल्ह्यातील खडकपूर्णा हा मोठा प्रकल्प 100 टक्के भरला आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा लक्षात घेता धरणाचे संपूर्ण 19 दरवाजे उघडण्यात आली आहेत. सध्या नदीपात्रात 1 लक्ष 7 हजार 919 क्युसेकचा विसर्ग खडकपूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरी नदीतील पूर विसर्गामुळे नदीच्या डाव्या व उजव्या तिरावरील 19 गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

0 Comments