हिमेश रेशमियाच्या ‘हॅप्पी हार्डी अँड हिर’ या सिनेमाच्या प्रोमोशनल कॉन्सर्टची सुरुवात
पुणे :-बॉलिवूडमध्ये आता नवीन
वर्षाची सुरुवात म्युझिकल पध्दतीने होणार आहे कारण गायक, संगीत दिग्दर्शक, अभिनेता
उर्फ रॉकस्टार हिमेश रेशमियाचा आगामी हिंदी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी अँड हिर’ ३ जानेवारी रोजी
प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रॉकस्टार हिमेशने
पुण्यात येऊन पुणेकरांची मनं जिंकली...पुणेकरांनी देखील हिमेशचे दणक्यात स्वागत
करुन त्याला आणि त्याच्या सिनेमासाठी भरपूर शुभेच्छा दिल्या.
म्युझिकल फिल्म ऑफ दि
इयर ठरणा-या ‘हॅप्पी हार्डी अँड
हिर’ या सिनेमात हॅप्पी, हार्डी आणि हिरअशी तीन ‘दिल से इंडियन’ पात्र आहेत, त्यांची लव्हस्टोरी
आणि ख-या प्रेमाची जर्नी म्हणजे हा सिनेमा. या सिनेमात डबल रोल आहे आणि या कथेसाठी
उत्तम संगीत, गाणी तयार करण्यात आली आहे. हिमेश रेशमिया आणि अभिनेत्री सोनिया मन
यांची जोडी यामध्ये दिसणार आहे.
‘तेरी मेरी कहानी’ आणि ‘आशिकी में तेरी’ ही दोन
गाणी ब्लॉकबस्टर हिट होती, अक्षरश: प्रेक्षकांनी या
गाण्यांना प्रचंड प्रतिसाद दिला होता. आणि ‘हॅप्पी हार्डी
अँड हिर’ या सिनेमात देखील एका पेक्षा एक उत्तम गाणी आहेत
आणि ती उत्तम पध्दतीनेच प्रदर्शित झाली पाहिजेत आणि त्यासाठी उत्तम योजना केली
गेली पाहिजे असा विचार हिमेश रेशमिया, निर्मात्या दिपशिखा देशमुख आणि सबिता
मानकचंद आणि म्युझिक लेबल कंपनी ‘टीप्स’ यांनी केला. त्यानंतर असे ठरवण्यात आले की भारतातील १२ शहरांमध्ये
प्रोमोशनल कॉन्सर्ट आयोजित करायचा आणि सुरुवात पुण्यापासून करायची.
याविषयी आपले मत आणि
उत्सुकता मांडताना हिमेश रेशमियाने म्हटले की, ‘हॅप्पी हार्डी अँड हिर’च्या सिटी टूरसाठी
मी खूप उत्सुक आहे. मला नाही वाटत या पूर्वी अशा प्रकारची प्रोमोशन स्ट्रॅटर्जी
करण्यात आली असावी आणि हे फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य
झाले आहे ज्यांनी ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमातील संगीताला लोकप्रिय
केले आणि मनापासून दाद दिली. सिनेमाच्या संगीताला मिळालेल्या यशाच्या प्रवासात
ट्रेलर प्रदर्शित करण्याची देखील पहिलीच वेळ आहे. जेव्हा-जेव्हा मी पुण्यात
गाण्याचे कार्यक्रम केले तेव्हा-तेव्हा या शहराने मला खूप छान प्रतिसाद दिला आहे. आणि
मला खात्री आहे की पुण्यात होणारी ‘हॅप्पी हार्डी अँड हिर’ची प्रोमोशनल कॉन्सर्ट मला पूर्वी पेक्षा जास्त प्रेम आणि प्रतिसाद देईल,
जो माझ्यासाठी एक अनमोल अनुभव ठरेल. प्रेक्षकांनी
माझ्या या सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी प्रतिक्षा केली, उत्सुकता दाखवली याचा मी
मनापासून आभारी आहे आणि पुण्यासह भारतातील इतर शहरांत होणा-या कॉन्सर्ट्ससाठी मी
आतूर आहे.”
0 Comments