शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम-सीतारामन
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.  विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.
  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या  सकाळी 11 वाजता 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. रोजगार निर्मिती, मंदी या सगळ्याचं सावट देशावर आहे. ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन विरोधक सातत्याने निशाणा साधत आहेत. ही सगळी आव्हानं पेलत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ज्याला आता सुरुवात झाली आहे. या अर्थसंकल्पात काय काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निर्मला सीतारामन या त्यांच्याकडचा ‘बही खाता’ घेऊन संसदेत दाखल झाल्या आहेत.