बुलडाणा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग अथवा राज्य स्तरावरील तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात सुधारीत शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. त्यानुसार शालेय स्पर्धेतील खेळाडूंकरीता विहित नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ट-ई, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट, खेळाचे प्रमाणपत्र तसेच एकविध क्रीडा संघटनामार्फत खेळाडू असल्यास विहीत नमुना अर्ज, आडवा चार्ट परिशिष्ठ ई, प्रत्येक खेळाडूंचे स्वतंत्र हॉल तिकीट, मान्यता प्राप्त खेळाचे प्रमाणपत्र, शासन निर्णय दि. 20 डिसेंबर 2018 अन्वये परिशिष्ठ क्र.10 अन्वये वैयक्तीक व सांघिक खेळाडूंची माहिती जिल्हा अथवा राज्य संघटनेमार्फत सादर करणे आवश्यक आहे. संबंधित शाळा/ कनिष्ठ महा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांनी खेळाडूंचे परिपुर्ण प्रस्ताव विहीत नमुण्यात 31 मार्च 2020 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.
गुण सवलतीकरीता आर्चरी, ॲथलेटीक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टींग, बास्केटबॉल, बॉक्सींग, सायकलींग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टीक्स, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलीबॉल, लॉनटेनिस, रायफल शुटींग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरु हॉकी, फुटबॉल, रग्बी, सेपक टकरा, मॉडर्न पेन्टॅथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ, क्रीकेट, थ्रोबॉल, रोलर स्केटींग/हॉकी, योगासन, किक बॉक्सींग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शुटींगबॉल, टेनिक्वाईट, आट्यापाट्या या खेळांचा समावेश राहील.
त्याअनुषंगाने सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात खेळाडूंनी क्रीडा सवलतीचे वाढीव गुण सवलत मिळण्याकरीता ऑनलाईन प्रस्ताव तयार करुन, त्या प्रस्तावाची हार्ड कॉपी दोन प्रतीत प्राचार्य/मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीसह तसेच प्रमाणपत्र साक्षांकीत करुन शारीरिक शिक्षक यांचे मार्फतच 31 मार्च 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.