पुणे :राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आपल्या पदाची मुदत संपल्याने आपण राजीनामा दिल्याचे अजिंक्यराणा पाटील यांनी सांगितले आहे. तर आपण युवक राष्ट्रवादीत काम करण्यास इच्छुक असून मला संधी द्यावी अशी इच्छा देखील अजिंक्यराणा यांनी बोलून दाखवली आहे.आता विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाल्याने या पदासाठी अनेक नावं चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीने पक्षात अनेक युवकांना संधी दिली आहे. त्यामुळे विध्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महत्व त्या अर्थाने अधिक वाढले आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दोन तीन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे .यातील पुण्यातील परीक्षित तळोकार यांच्या नावाची ह्या पदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे.
परीक्षित तळोकार हे मूळचे नाशिकचे असून सध्या पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे .सिंहगड शिक्षक आंदोलनावेळी देखील त्यांनी मोठा आवाज उठवला होता. ह्या संबधी प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांना अनेक विध्यार्थ्यांनी पत्र लिहिलं आहे. परीक्षित तळोकार यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करावे अशी मागणी बुलढाण्यातील राष्ट्रवादीतील कार्यकर्ते गणेश राजपुत यांनी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना
केली आहे.