लोणार:- काही दिवसांपूर्वी लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग अचानक गुलाबी झाला होता. त्यात बरेच दिवस झाले या पाण्याचा रंग नेमका कसा बदलला होता या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यात आता पुण्याच्या आगरकर आणि नागपूर च्या नीरी संस्थेचा यासंदर्भातला अहवाल प्राप्त झाला आहे . या मधल्या काळात बरेच प्रश्न लोणार च्या विकास आराखड्यावर सर्व स्तरातून विचारण्यात आले होते . त्यात हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते . अशातच आता लोणार सरोवराच्या विकासासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्देश दिला असून बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून काम करण्याचे निर्देश दिले आहेत . पण मात्र या प्राधिकरणाचा भाग म्हणून (कमिटीवर ) अशासकीय व अराजकीय व्यक्ती असावा अशी मागणी आता जिल्ह्यातील काही युवक करीत आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात हा अध्यक्ष नेमका कुठला असेल हे मात्र येणारा काळच सांगेल. पण येणाऱ्या काळात या प्रश्नावरून जिल्ह्यातील राजकारण मात्र तापणार हे नक्की.
लोणार सरोवराच्या विकासासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्देश दिला आहे. त्यासाठी त्यांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून काम करण्याचे निर्देश दिले आहेत . नोडल अधिकाऱ्यांसोबत काम करायला एखादा अशासकीय असावा आणि त्याचा सरोवराच्या विकास आराखड्याचा अभ्यास असणारा असावा आणि त्याने काही काळ लोणार साठी काम देखील केलेले असावे असा मला जिल्ह्याचा युवक म्हणून वाटते .
-भुजंग काळे (अभ्यासक लोणार सरोवर )
0 Comments