चिखली :    दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्री रेणुका देवी संस्थान चिखली आणि बचानंद स्वामी संस्थान यांच्या वतीने रेणुका    देवी यात्रा महोत्सव आणि वहन मिरवणूक शोभायात्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमा दि. १९ एप्रिल शुक्रवार ला यात्रा महोत्सवास सुरुवात होणार आहे.१९ एप्रिल सकाळी पारंपारिक वगदी प्रदिक्षणा असणार आहे व संध्याकाळी वहन मिरवणूक व बारुदखाना असेल.वहन मिरवणूक संधयाकाळी ६ वाजता मंदिरातून निघेल व दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० एप्रिल ला सकाळी १० वाजता प्रदिक्षणा करून मंदिरात पोहचेल.वहन प्रदिक्षणादरम्यान  वाजंत्री,लोकनृत्य ,मनोरंजन खेळ ,टिपरी मंडळाचे आकर्षक कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या पथकांचे आकर्षक ढोल वादन याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच दि.२० तारखेला भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान श्री रेणुका देवी संस्थान च्या वतीने समस्त शहरवासीयांना यात्रे दरम्यान संपूर्ण चिखली शहर स्वछ ठेवण्याचे जाहीर आवहान करण्यात आलेले आहे .