भेंडवळ : गेल्या ३५० वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या ठिकाणी एक परंपरा चालु आहे. राजकीय , कृषीविषयक,पर्जन्यमान,आरोग्य ,देश ,हवामान इत्यादी सर्व भाकित भेंडवळ च्या घटमांडणी केले जातात.
दरवर्षी  अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ही घटमांडणी केली जाते. यावर्षीही सर्व नागरिकांचे लक्ष भेंडवळ च्या घटमांडणी कडे लागले आहे. ३५० वर्षांपूर्वी भविष्यातील हवामान कळण्यासाठी कोणतेही साधन नव्हते किंवा हवामान खातेही नव्हते या काळी पीक-पाणी ,पर्ज्यन्यमानाचा मुख्यत्वे कृषी विषयाचा अंदाज घेता यावा या साठी भेंडवळ येथील वाघ पाटील परिवारातील रामचंद्र महाराज यांनी त्या काळी कठोर तपस्या करून ही घटमांडणी सुरु केली तेव्हापासून आजपर्यंत ही सेवा अखंडितपणे चालु आहे . वर्षानुवर्षे या घटमांडणीच्या आधारावर या वर्षी पीक पाणी कसे असेल ,किती पर्ज्यन्यमान असेल,देशाचे संरक्षण कसे असेल ,राजा कोण असेल ,राजकीय भविष्य काय असेल असे अंदाज वर्तवण्यात येतात आणि वर्तवलेल्या अंदाजामधले जवळपास ८५ ते ९० अंदाज दरवर्षी बरोबर होत असल्याने लोकांचा या वरचा विश्वास वाढला आहे. महाराष्ट्रात गेल्या ४ वर्षांपासून सतत कोणत्या न कोणत्या भागात दुष्काळ परिस्थिती आहेच त्यामुळे यंदाचं वर्ष हे पाण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच वर्ष मानलं जात आहे त्यात याच वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडनुका आहेत त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेता यंदाच्या वर्षी घटमांडणी कडे अनेक शेतकरी आणि राजकीय पंडितांच लक्ष असणार आहे. आजच्या वैज्ञानिक युगात सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी ही भेंडवल ची घटमांडणी करतात . आजपर्यंत घटमांडणीमध्ये राजकीय जे जे मांडले आहे ते आज पर्यंत खरे ठरत आले आहे त्यामुळे अर्थातच सट्टाबाजाराचेही  या घटमांडणी कडे लक्ष लागलं आहे .