बुलढाणा जिल्ह्यातुन कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी ...!

चैनसुख संचेती
संजय कुटे

बुलढाणा: देशाच्या निवडणुकांचा कौल हा २३ मे ला देशासमोर येणार आहे. त्यातच याच वर्षी राज्यात विधानसभेच्याही निवडणूका आहेत . याच पार्श्ववभूमीवर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सुत्रांकडून कळली आहे. यामध्ये अनेक मोठ्या नावांची चर्चा नव्या मंत्रिमंडळासाठी चालु आहे यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील ,जयदत्त क्षीरसागर आणि रणजितसिंह मोहिते पाटील अशी नवीन नाव चर्चेत आहेत. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांची नाव नव्या मंत्रिमंडळात समोर येऊ शकतात. यामध्ये चैनसुख संचेती आणि संजय कुटे हि नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत. त्यातील चैनसुख संचेती हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत आणि संजय कुटे हे देखील मागील अनेक वर्षांपासून विधानसभेवर निवडून गेले आहेत .भाजपा-सेनेची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशा ज्येष्ठ व दिग्गज नेत्यांची मोठी फळी भाजपाकडे होती; मात्र या नेत्यांपैकी काहींना मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत ठेवत आता सरकारच्या शेवटच्या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातून चैनसुख संचेती यांना विदर्भ विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली होती. पण जिल्ह्यातील नेत्यांची जेष्ठता बघता त्यांची या नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातुन कोणाची वर्णी लागते का ? हे बघणं औत्सुक्याच ठरणार आहे.