चिखली मतदारसंघात चर्चेला उधाण ...!
चिखली :- बुलढाणा जिल्यातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेस चे आमदार राहुल बोन्द्रे यांचा भाजप मध्ये पक्षप्रवेश होणार असल्याच्या चर्च्यांना राजकीय वर्तुळात उधाण आलय. आ.राहुल बोन्द्रे हे चिखली विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करतायेत त्यांच्या कडे सध्या जिल्हा काँग्रेस चे अध्यक्षपद देखील आहे. आ. राहुल बोन्द्रे यांची ओळख कुशल संघटक व चतुर राजकारणी म्हणून जिल्ह्यात आहे. २०१४ मध्ये देखील मोदी लाट असताना सुद्धा त्यांनी विजय मिळवला होता. पण आता २०१९ मध्ये परिस्थिती वेगळी आहे, काँग्रेसच या लोकसभा निवडणुकीत अक्षरशः पानिपत झालय. काँग्रेस चे ९ मुख्यमंत्री हि लोकसभा निवडणूक हरले आहेत त्यात पक्षाची स्तिथी वाईट आहे त्यात नेतृत्वाची पण कमतरता सध्या काँग्रेस पक्षात आहे. त्यामुळे आ. राहुल बोन्द्रे हे आगामी निवडणुकीतील प्रबळ उमेदवार आहे ही बाब भाजप पक्षश्रेष्ठीनी हेरली असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस चे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने भाजप मधून लोकसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील लवकरच काही आमदारांना घेऊन भाजप मध्ये पक्षप्रवेश करणार आहे त्या आमदारांमध्ये राहुल बोन्द्रे यांच्या नावाची देखील चर्चा आहे . आ. राहुल बोन्द्रे च्या पक्षप्रवेशाच्या चर्चेने मात्र भाजप मधील एका गटात साहजिकच नाराजी पसरली आहे. चिखली विधानसभेत भाजप चे वेगवेगळे गट आहेत काही गटात आ. राहुल बोन्द्रे च्या पक्षप्रवेशावरुन अनुकूल मत आहे तर काही गटांमध्ये संयमी भूमिका दिसून येत आहे. यामुळे जिल्यातील राजकारण मात्र नक्कीच ढवळून निघालाय यात काही शंका नाही. हा संभाव्य पक्षप्रवेश होईल कि नाही हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे .

0 Comments